गुजरातच्या पराभवानंतर आशिष नेहराच्या मुलांना रडू कोसळले   

मोहाली : आयपीएल २०२५ मधील गुजरात टायटन्सचा प्रवास संपला आहे. एलिमिनेटर सामन्यात गुजरातला मुंबई इंडियन्सविरुद्ध पराभव स्वीकारावा लागला. गुजरात सातत्याने पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर राहिला. पण शेवटच्या दोन गट सामन्यांमध्ये पराभव झाल्यानंतर त्यांना एलिमिनेटर खेळावे लागले. जिथे मुंबई इंडियन्सने २० धावांनी विजय मिळवला. गुजरात टायटन्सच्या पराभवानंतर संघाचे मुख्य प्रशिक्षक आशिष नेहराची मुलगी आणि मुलाला अश्रू अनावर झाले होते. डावातील शेवटचा चेंडू टाकल्यानंतर, कॅमेरा गुजरात टायटन्स संघाच्या कुटुंबीयांकडे गेला. सगळेच दुःखात बुडाले होते. आशिष नेहराच्या मुला-मुलीच्या डोळ्यात अश्रू होते. तर शुभमन गिलची बहीणही गुजरातला पाठिंबा देण्यासाठी आली. यादरम्यान, शहनील गिल आशिष नेहराच्या मुलीला शांत करताना दिसून आली. तथापि, यावेळी ती देखील भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.   
 
दरम्यान, मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहित शर्मा आणि जॉनी बेअरस्टो यांनी मिळून ७.१ षटकांत ८४ धावा जोडल्या. त्यानंतर बेअरस्टो २२ चेंडूत चार चौकार आणि तीन षटकारांसह ४७ धावा काढून बाद झाला.

Related Articles